घामाच्या धारा थांबणार, लवकरच जलधारा बरसणार… मान्सून ट्रॅकवर – IMD

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मान्सून सामान्यपणे प्रगती करत असून येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात पोहोचेल, अशी माहिती हिंदुस्थानच्या हवामान खात्याने गुरुवारी ही माहिती दिली.

आयएमडीचे (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ आर.के. जेनामनी म्हणाले की, मान्सूनने 31 मे ते 7 जून दरम्यान दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापला.

यादरम्यान, मान्सूनने संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानात प्रवेश केला, ज्यात चांगला पाऊस झाला, असे ते म्हणाले.

‘मान्सूनच्या प्रगतीला उशीर झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत मुंबई व्यापेल’, असे जेनामनी यांनी पत्रकारांना सांगितले.

‘जोरदार वारे आहेत आणि ढग तयार होऊ लागले आहेत पुढील दोन दिवसात तो बराच भाग व्यापेल’, असे ते पुढे म्हणाले.

येत्या दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.