
चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरस जगभरात पसरला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 14 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून पसरलेल्या या व्हायरसचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. संपूर्ण युरोप बंद झाले आहे.
अमेरिकेत 33 हजार 546 जणांना लागण
अमेरिकेत एका दिवसांत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 33 हजार 546 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 419 जणांचा मृत्यू झाला आहे.
व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार न्युयॉर्क, कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन ही शहरं कोरोनाचे केंद्र झाली आहेत. तसेच पुढील 10 दिवस आपण दररोज पत्रकार परिषद घेऊ असेही त्यांनी सांगितले. न्युयॉर्कमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यांची संख्या 15 हजार इतकी आहे. तर 114 जणांचा मृत्यू झाला आहे.
इटलीत 3 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू
चीनमधून पसरलेल्या या व्हायरसचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. संपूर्ण युरोप बंद झाले आहे. इटलीत आतापर्यंत 5 हजार 476 जणांचा मृत्यू झला आहे. जगातील हा सर्वात मोठा आकडा आहे. तर इटलीत 59 हजार 138 जणांना याची लागण झाली आहे.
स्पेन आणि फ्रान्समध्ये वाढला मृतांचा आकडा
इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाला असून त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. तर मृतांमध्ये स्पेनचा तिसरा क्रमांक लागतो. स्पेनमध्ये आतापर्यंत 1 हजार 772 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 हजार 776 जणांना याची लागण झाली आहे. फ्रान्समध्ये 676 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 16 हजार 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

























































