माता न तु वैरिणी – पसारा केला म्हणून आईनेच केला मुलाचा खून

death

लहान मुल म्हटलं की ते पसारा करणारच. अनेकवेळा लहान मुलांनी पसारा केला म्हणून आई आपल्या मुलांना बदडते. पण युक्रेनमध्ये एका मुलाने पसारा केला म्हणून आईने त्याचा जीवच घेतला आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आईने ही घटना लपवण्याचा प्रयत्नही केला. अखेर पोलिसांनी आईला बेड्या ठोकल्या आहेत.

डेली मेल या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. युक्रेन या देशात सोकोलविया गावात एक कुटुंब राहत होते. एलिना या 25 वर्षीय महिलेला एक पाच वर्षाचा मुलगा आणि एक 6 वर्षाची मुलगी होती. मुलाने खेळता खेळता खूप पसारा केला. हा पसारा पाहून इलिनाच्या तळपायाची आग आग मस्तकात गेली.

तिने आपल्या मुलाला जबर मारहाण केली. त्याचे डोके भिंतीवर वारंवार आपटले. इतकेचे नाही तर त्यांच्या तोंडावर ती बसून होती. यात जबर मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या बहीणीने हे सारे आपल्या डोळ्यांनी पाहिले आणि ती चांगलीच भेदरली. नंतर मुलगा श्वास घेत नव्हता म्हणून एलिनाने त्याला एका घोंगडीत पांघरून ठेवले होते.

नंतर मुलगा अनेक दिवस शाळेत आला नाही म्हणून शाळेचे काही शिक्षक त्याच्या घरी गेले. तेव्हा एलिना आपल्या मुलाला घेऊन घराच्या आवारात उभी होती. शिक्षकांनी मुलाला हात लावला तेव्हा त्याचे शरीर बर्फासारखे थंड होते.

त्यांनी तातडीने पाहिले असता मुलाचा मृत्यू झाला होता. त्यांनी लागलीच पोलिसांना फोन केला आणि मुलाचा मृतादेह रुग्णालयात पाठवला. मुलाच्या डोक्याला गंभीर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवलात स्पष्ट झाले.

पोलिसांनी आरोपी महिलिची रवानगी मानसोपचारतज्ज्ञाकडे केली आहे. ही महिला वेडी नसल्याचे कळते. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या