या दिवशी रिलीज होणार ‘दे धक्का’ चित्रपटाचा सिक्वेल, पाहा हे मोशन पोस्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळी गाजलेल्या दे धक्का या चित्रपटाचा दे धक्का -2 हा सिक्वेल लवकरच येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टारकास्टची ओळख करून देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, गौरी इंगवले, संजय खापरे, विद्याधर जोशी, प्रवीण तरडे हे दिसणार आहे. हा चित्रपट येत्या 5 ऑगस्ट 2022 ला प्रदर्शित होणार आहे.