पाणी पुरवठा योजना  सौरउर्जेवर सुरू करण्यासाठी अहवाल सादर करा- खा. विखे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sujay-vikhe patil

सामना प्रतिनिधी । नगर

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विविध कारणाने बंद पडलेल्या सर्व पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविण्याच्या संदर्भात तातडीने प्रकल्प अहवाल तयार करा अशा सूचना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठा अधिकार्‍यांना दिल्या.

विविध गावातील पाणी पुरवठा योजना थकीत वीज बील अथवा पाणीपट्टीची रक्कम थकल्याच्या कारणाने बंद आवस्थेत आहेत.गावपातळीवर पाणी पुरवठा योजना असूनही याचा लाभ ग्रामस्थांना होत नसल्याची बाब समोर आल्याने खा.डॉ.विखे पाटील यांनी अशा बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना सौरउर्जेवर चालविण्याची संकल्पना बोलून दाखविली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान त्यांनी याबाबत लोकांना आश्वासित केले होते.

याच पार्श्वभूमीवर खा.डॉ.विखे यांनी सोमवारी जिल्हा षरिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,  उप अभियंता  सोळुंके साहेब, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कोरडे साहेब, तसेच सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली.या बैठकीत बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा त्यांनी अधिकार्‍यांकडून जाणून घेतला.योजना बंद पडण्याची कारण जाणून घेतेनाच योजना पुन्हा  सुरू कशा होतील याचाही विचार बैठकीत प्रामुख्याने करण्यात आला.

या पाणी पुरवठा योजनांना भेडसावणारा वीजबीलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून या सर्व योजना सौर उर्जेवर सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना खा.डॉ.विखे यांनी दिल्या.