धोनीचे कट्टर फॅन आहात तर ‘या’ गोष्टी माहिती असायला हव्यात

2412

हिंदुस्थानच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणना होणारा, जगातील ‘बेस्ट फिनिशर’ असा नावलौकिक मिळवलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज निवृत्त झाला. इंग्लंडमध्ये 2019 ला झालेल्या विश्वचषकापासून तो मैदानात उतरलेला  नव्हता. धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत, परंतु तुम्ही जर धोनीचे कट्टर फॅन असले तर पुढील गोष्टी माहिती असायला हव्यात…

1. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 मधील आयसीसी टी-20 वर्ल्डकप, 2011 चा एक दिवसीय क्रिकेट वर्ल्डकप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्ज केला आहे.

2. क्रिकेटआधी धोनीला फुटबॉलमध्ये रस होता आणि शाळेच्या संघात तो गोलकीपर होता. फुटबॉ़लप्रती असणाऱ्या प्रेमापोटीच त्याने इंडियन सुपर लीगमध्ये ‘चेन्नई एफसी’ हा संघ खरेदी केला. क्रिकेट, फुटबॉलनंतर माहीला बॅडमिंटन हा खेळ सर्वाधिक आवडतो.

ms-dhoni

3. धोनीला मोटर रेसिंग बाईकची देखील आवड आहे. त्याच्याकडे विविध प्रकारच्या बाईक्स आहेत. तसेच त्याने मोटररेसिंगमध्ये ‘माही रेसिंग’ नावाची एक टीम खरेदी केलेली आहे.

4. सुरुवातीच्या काळात धोनी आपल्या लांब केसांसाठी प्रसिद्ध झाला होता. धोनीसारखे केस ठेवायची तेव्हा फॅशन आली होती. 2011 च्या वर्ल्डकपनंतर धोनीने आपल्या हेअर स्टाईलमध्ये बदल केला. लाखो चाहते धोनीच्या केसांचे दिवाने असले तरी त्याला मात्र अभिनेता जॉन अब्राहमचे केस आवडतात.

dhoni-long-hair

5. एम.एस. धोनीला 2011 मध्ये हिंदुस्थानी सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवी मिळाली. लहानपणापासून लष्करामध्ये सहभागी होण्याचे आपले स्वप्न होते, असे धोनीने अनेकदा बोलूनही दाखवले आहे.

6. 2015 मध्ये आग्रा येथील पॅरा रेजिमेंटमधून पॅरा जंप लगावणारा धोनी पहिला खेळाडू ठरला. पॅरा ट्रुपर ट्रेनिंग स्कूलमधून ट्रेनिंग घेतल्यानंतर धोनीने जवळपास 15 हजार फुटांवरुन पाच वेळा उडी मारली होती आणि विशेष म्हणजे यातील एक उडी रात्री मारलेली होती.

dhoni-army

7. धोनीला दुचाकींची भारी आवड आहे. त्याच्याकडे दोन डझनपेक्षा जास्त आधुनिक मोटर बाईक आहेत. तसेच विविध चारचाकी देखील त्याच्या ताफ्यात आहेत.

8. क्रिकेटमध्ये अनेक शिखरं गाठलेल्या धोनीचे नाव विविध अभिनेत्रींसोबत जोडले गेले. परंतु त्याने 4 जुलै, 2010 रोजी डेहराडून येथे साक्षी रावत सोबत सात फेरे घेतले. त्यांना झिवा नावाची एक मुलगी देखील आहे.

dhoni-family

9. धोनीला क्रिकेट खेळताना पहिली नोकरी रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून मिळाली होती. यानंतर त्याने एअर इंडियामध्ये नोकरी केली. तसेच एन. श्रीनिवासन यांच्या ‘इंडिया सिमेंट्स’ या कंपनीमध्ये तो भागीदार झाला.

10. धोनी जगातील सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेट खेळाडू राहिला आहे. कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेण्याआधी धोनीचे वर्षाला सरासरी उत्पन्न 150 ते 190 कोटी रुपये होते.

11. धोनीच्या आयुष्यावर बॉलिवूडमध्ये ‘एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटही आला. यात सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका साकारली आहे.

dhoni-untold-story

आपली प्रतिक्रिया द्या