महावितरणचे ऑनलाइन ‘कलेक्शन’ जोरात, महिन्याला 65 लाख ग्राहक भरतात 1400 कोटींचे वीज बिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणचे ऑनलाइन वीज बिल कलेक्शन जोरात आहे. अडीच कोटींपैकी तब्बल 65 लाख ग्राहक प्रत्येक महिन्याला ऑनलाइनच्या माध्यमातून 1400 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे बिल भरत आहेत. ग्राहकांनी ऑनलाइन बिल भरल्याने वीज बिल भरणा पेंद्र चालकाला द्याव्या लागणाऱया दोन-तीन टक्के कमिशनची बचत होत आहे.

वीज ग्राहकांना घरबसल्या वीज बिल भरता यावे म्हणून महावितरणने आपल्या संकेतस्थळावर ऑनलाइन वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच मोबाईल अॅपसह अन्य पर्यायांच्या माध्यमातूनही निःशुल्क वीज बिल भरता येते.

त्यानुसार महावितरणचे कोकण प्रादेशिक विभागातील 30 लाख 54 हजार वीज ग्राहक दरमहा सरासरी 695 कोटी रुपयांचे वीज बिल ऑनलाइनद्वारे भरतात, तर पुणे प्रादेशिक विभागातील 18 लाख 71 हजार ग्राहकांकडून 425 कोटी रुपयांचा भरणा केला जातो.

नागपूर प्रादेशिक विभागात 10 लाख 88 हजार ग्राहकांकडून 189 कोटी 64 लाख रुपये, संभाजीनगर प्रादेशिक विभागात 4 लाख 94 हजार वीज ग्राहक 105 कोटी 41 लाख रुपयांचा ऑनलाइन बिलांचा भरणा करत आहेत. कोरोना संसर्गामुळे वीज ग्राहकांनी पेंद्रावर जाऊन बिल भरण्यापेक्षा ऑनलाइन भरण्याचे आवाहन महावितरणने केले.