भरावामुळे महामार्गावर तलाव: खरवते येथील घटना

45

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये खरवते पऱ्या येथे सुमारे दहा ते पंधरा मिटर उंचीचा भराव टाकण्यात आल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले. त्यामुळे खरवते कोदवली मधील काही घरांसह राजापुर शहराला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, संबंधीत महामार्ग विभाग व कामाचा ठेका घेतलेली केसीसी कंपनी यांच्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरु झाले आहे.

या वृत्ताची माहिती मिळताच आमदार राजन साळवी यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी करत महामार्गाचे अधिकारी व कंपनीचे प्रतिनिधी यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यावेळी सभापती अभिजीत तेली, उपसभापती प्रशांत गावकर, तालुका संघटक उमेश पराडकर, शहर प्रमुख संजय पवार, जेष्ठ शिवसैनिक महेश पाध्ये, सरपंच चौगुले, आडवली शाखा प्रमुख सूर्यकांत चव्हाण उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या