अक्षय्य तृतीयेला देवदर्शनासाठी गर्दी, मुंबादेवीला 1100 डझन आंब्यांची आरास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त रविवारी श्री मुंबादेवीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली होती. देवीचा गाभारा 1100 डझन आंब्यांनी सजवण्यात आला होता. दरवर्षी अक्षय्य तृतीयेला मुंबादेवी मंदिरात असा आंबा महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. देवीच्या गाभाऱयाबरोबरच मंदिरामध्येही आंब्याची सजावट करण्यात आली होती.