92 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. वयोवृध्दांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे दिसून येत असतानाच मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या घनश्यामदास चंचलानी (92) आणि माधुरी संपत (91) यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

पनवेलमध्ये राहणारे घनश्यामदास चंचलानी (92) यांना अचानक ताप येऊ लागला होता. स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. म्हणून कोविडची शक्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांची स्वॅब टेस्ट आणि रक्तचाचणी केली. या चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. याशिवाय, ९१ वर्षीय माधुरी संपत यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यांनाही वोक्हार्ट रूग्णालयात हलवण्यात आले. या रूग्णालयातील कन्सल्टेंट फिजिशियन डॉ. बेहराम पारडीवाला यांच्या देखरेखीखाली या दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू होते.