मुंबई महापालिकेने 31 मे रोजी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आज प्रभाग निहाय आरक्षणाबाबत अधिसूचना जारी करत आरक्षणावर शिक्कामोर्तब केले. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेकडून प्रभाग आरक्षण सोडत 31 मे रोजी काढण्यात आली.
यावर 1 ते 6 जूनपर्यंत हरकती-सूचना मागवण्यात आल्या. या कालावधीत 232 सूचना-हरकती प्राप्त झाल्या. त्यांना पालिका आयुक्तांनी मान्यता देऊन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला. आ़योगाने अंतिम प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करून आज प्रसिद्ध केले. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज आहे. सध्या 90 टक्के मतदारयाद्यांचे काम पूर्ण झाले आयोगाच्या निर्देशानुसार पुढील निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.
असे आहे आरक्षण
अनुसूचित जातींसाठी 15 प्रभाग आरक्षित ठेवले आहेत. त्यापैकी 8 प्रभाग महिलांसाठी राखीव असणार आहे तर अनुसूचित जमातीसाठी 2 प्रभाग आरक्षित आहेत. त्यापैकी एक प्रभाग महिला आरक्षित आहे तसेच २१९ प्रभाग खुल्या वर्गासाठी ठेवण्यात येणार आहेत त्या पैकी 109 प्रभाग महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.

























































