मुंबईसह सहा महापालिका पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारीला मतदान

1292

मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर वॉर्ड क्र. 141 सह नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महापालिकांमधील सात रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 10 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

मानखुर्द-शिवाजीनगर येथील नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन सपत्नीक शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर 9 जानेवारी रोजी पोटनिवडणूक होणार असून यासह अन्य सहा महापालिकांतील रिक्त जागांवरही पोटनिवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्ज 16 ते 23 डिसेंबर या कालावधीत दाखल करता येतील. 22 डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे उमेदवारी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 24 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 26 डिसेंबरपर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱया उमेदवारांना 27 डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 9 जानेकारी 2020 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल.

पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग ः नाशिक – 22 अ आणि 26 अ, मालेगाव – 12 ड,  नागपूर – 12 ड, लातूर – 11अ, पनवेल – 19ब आणि मुंबई – 141.

आपली प्रतिक्रिया द्या