मुंबईतील 123 कॅथॉलिक चर्च प्रार्थनेसाठी बंद

109

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबईतील 123 कॅथॉलिक चर्च प्रार्थनेसाठी 5 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती बिशप यांनी हायकोर्टात शुक्रवारी दिली तसे प्रतिज्ञापत्र त्यांनी शुक्रवारी खंडपीठासमोर सादर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना प्रार्थने (मास)साठी चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांकडून गर्दी केली जात असल्याचे सविना ख्रास्तो या महिला वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तशी छायाचित्रेही कोर्टाला दाखविण्यात आली. याची दखल घेत हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची शहानिशा करून त्याबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यानुसार मुंबईचे बिशप ओसवाल्ड कार्डिनल ग्रासियास यांनी खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत चर्चमधील प्रार्थना स्थगित करण्यात आल्याचे कोर्टाला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या