
मुंबईच्या ऐतिहासिक टाऊन हॉलच्या पायऱ्यांवरची सायंकाळ आणि सोबतीला शास्त्राrय संगीताची मैफल… असा योग जुळून येणार आहे 14 आणि 15 जानेवारी रोजी. इंडियन हेरिटेज सोसायटी आणि महाराष्ट्र पर्यटन यांच्या सहकार्याने 31 व्या मुंबई संस्कृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे मुंबई विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन हॉलमध्ये महोत्सवाचे वर्च्युअली आयोजन करण्यात आले होते. यंदा संस्कृतीचा हा सोहळा पूर्वीसारखाच टाऊन हॉल येथे साजरा होत आहे.
पहिल्या दिवशी सायंकाळी राहुल शर्मा (संतूर) यांच्यासोबत पंडित भवानी शंकर (पखवाज) व पंडित मुपुंदराज देव (तबला) पंडित शिवकुमार शर्मा यांना मानवंदना देतील.
दुसऱया दिवशी सायंकाळी विदुषी शुभा मुदगल (गायन) यांच्यासोबत पंडित अनिश प्रधान (तबला) व पंडित सुधीर नायक (हार्मोनियम) आपल्या स्वरांनी उपस्थिताना मंत्रमुग्ध करतील.

























































