
पदवी कॉलेजच्या प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी सायंकाळी जाहीर झाली. मुंबईतील नामांकित कॉलेजच्या कटऑफमध्ये 2 ते 3 टक्क्यांची घट झाली आहे. पदवी प्रवेशाची दुसरी मेरिट ही 90 टक्क्यांहून वर पोहोचली आहे. यात आर्टर्स्, सायन्स आणि कॉमर्स शाखेसोबत इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सुमारे 836 हून अधिक कॉलेजमध्ये प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बीकॉम, बीएससी, बीएएफ, बीएमएम आदी अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 17 ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर झाली या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
काही कॉलेजांच्या जागा ‘हाऊस फुल’
आज जाहीर झालेल्या दुसऱया यादीनंतर मुंबईतील अनेक नामांकित कॉलेजांचे प्रकेश पूर्ण भरले आहेत, अशी माहिती अनेक नामांकित कॉलेजांच्या प्राचार्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता बऱयाच नामांकित कॉलेजांच्या प्रकेशाची तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता नाही.
रुईया महाविद्यालय
- बी ए प्रथम वर्ष 95.00%
- बीएस्सी प्रथम वर्ष 84.00 %
- बीएस्सी कम्युटर सायन्स 92.80%
- बीएमएम (आर्टस् ) 95.00%
- बीएमएम(कॉमर्स) 93.67%
- बीएमएम(सायन्स) 92.17%
विल्सन महाविद्यालय
- बीएएमएमसी, कला 93.00%
- बीएएफ 91.33%
- बीकॉम 87.02%
- बीएस्सी आयटी 87.67%
सेंट झेवियर्स महाविद्यालय
- विज्ञान 90.50क
- इतर 91.00क






























































