संयुक्त जयंती उत्सव साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव नुकताच साजरा झाला. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक, न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती अभय आहुजा आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडला. समितीच्या वतीने न्यायमूर्तीना शिवराज्याभिषेकाची प्रतिमा दिली गेली. या कार्यक्रमात न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी आपले विचार मांडले. तिन्ही महापुरुषांचे विचार आपण खरोखर अमलात आणतो की नाही असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी देखील आपले विचार मांडले. आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते भारतीय राज्यघटनेमुळेच. भारतीय राज्यघटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली. त्यामुळे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कायम ऋणी राहिलो पाहिजे. न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले या तिन्ही महापुरुषांच्या जीवनाचा आढावा घेतला. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, रवी पवार, शरद साळवे, संजय शेलार यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.