
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईचे दोन माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग आणि अरुप पटनायक यंदा लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. सत्यपाल सिंग उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत, तर मुंबईचे दुसरे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक ओडिशातील बिजू जनता दलाच्या तिकिटावर भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत.
मुंबईचे माजी पोलीसप्रमुख डॉ. सत्यपाल सिंग यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून बागपत मतदारसंघात तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग यांचा पराभव केला होता. यंदा सत्यपाल यांना अजित सिंग यांचे पुत्र जयंत चौधरी यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. दुसरे माजी आयुक्त अरुप पटनायक यांची लढत ओडिशाच्या भुवनेश्वर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आणि भुवनेश्वरच्या माजी पालिका आयुक्त् अपराजिता सरंगी यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत.




























































