
बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडणार आहे. गणेशोत्सापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे ‘ विसर्जन ‘ करण्याची सक्त ताकीद सरकारने अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे खड्ड्यात गेलेल्या या महामार्गाचे युध्दपातळीवर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच या काळात पाच दिवस अवजड वाहनांनाही ‘ नो एण्ट्री ‘ करण्यात आल्याने गणेशभक्तांची ट्रॅफिकच्या कचाट्यातून सु़टका होणार आहे.
आरटीपीसीआर करा, पण सक्ती नाही
10 सप्टेंबरपासून राज्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. रायगडातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असून दरवर्षी लाखो चाकरमानी आपल्या गावी येतात. माञ या वर्षीही कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे येणाऱ्या चाकरमान्यांनी लसीचे दोन डोस किंवा 72 तास आधी आरटीपीसीआर किंवा अँटीजन तपासणी करून यावे, असे आवाहन पालकमंञी आदिती तटकरे यांनी केले आहे. माञ याबाबत सक्ती नसून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने घेत असलेली काळजी असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंञी आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. ही बैठक मुंबई-गोवा महामार्ग आणि जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्याच्या खड्डेमय परिस्थितीवर गाजली. 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सण सुरू होत आहे. कोकणात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण दरवर्षी खड्डेमय रस्त्याचे विघ्न पार करत चाकरमान्यांना घर गाठावे लागते. या वर्षीही मुंबई-गोवा महामार्ग आणि जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या चाकरमान्यांना ञास होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर धरत गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरूस्त करा, अशा सूचना पालकमंञ्यांनी दिल्या. त्यामुळे चाकरमानी गणेशभक्तांचा प्रवास हा सुखकारक होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम हे संथगतीने सुरू असून दरवर्षी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्याचा ञास सहन करावा लागत असतो.

































































