
समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालाड पश्चिम येथील प्रज्ञा प्रबोधन शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘प्रबोधन व्यासपीठ’चे लोकार्पण विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार पोतनीस यांच्या आमदार निधीतून या वास्तूचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यावेळी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या जनजागृतीपर माहितीपुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. शिवाय शाळेचा निकाल 100 टक्के लागल्याबद्दल गुणवंत विद्यार्थी-शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रज्ञा प्रबोधन संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक पटेल, कार्यवाह विजय मांडाळकर, मधुकर राऊत, अमर मांडाळकर, हरिश्चंद्र राणे, सुनील कोठारे, मिलींद मांडाळकर आदी उपस्थित होते.
























































