
वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात मेट्रो लाईन 2 बी चे बांधकाम सुरू असताना बुधवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. प्री-कास्ट बीम उचलत असताना 400 टन वजनाची एक मोबाईल क्रेन अचानक उलटली आणि गर्डर खाली कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी पहाटे चार ते साडे चारच्या सुमारास एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शनजवळ घडली. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड या कंत्राटदाराकडून रात्रीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. एका क्रेनच्या गिअरमध्ये बिघाड झाल्याने लोड दुसऱ्या क्रेनवर पडला आणि त्यामुळे क्रेनचा तोल जाऊन ती उलटली.
#WATCH | Mumbai: A major accident occurred at the Metro construction site in Bandra Kurla Complex, Mumbai, where an entire beam fell while being lifted onto a pillar. During this, the mobile crane used to hoist the beam also toppled over.
(Early morning visuals from the spot… pic.twitter.com/h12rWEf9R4
— ANI (@ANI) April 15, 2026
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. उलटलेली क्रेन हटवण्यासाठी 600 टन क्षमतेची दुसरी क्रेन मागवण्यात आली आहे. रस्त्यावरील अडथळा दूर करून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. क्रेन उलटल्याने कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना लेट मार्क लागला.
“क्रेनच्या लिफ्टिंग बूममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली. आम्ही लवकरात लवकर रस्ता रिकामा करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
बसवराज एम.बी. एमएमआरडीएचे संचालक
VIDEO | Mumbai: A crane overturns amid metro construction work. MMRDA director Basavaraj MB said,
“As per our initial investigation, there was a gear failure in the lifting boom of one crane. After the failure, the load shifted to another crane, which caused it to tilt. The… pic.twitter.com/1mTPLNDCkH
— Press Trust of India (@PTI_News) April 15, 2026
दरम्यान, या अपघातामुळे बीकेसी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी मार्गात बदल केले आहे. आयसीआयसीआय बँक बेस्ट बस स्टॉप सिग्नलजवळून वाहने वळवण्यात आली आहेत. वाहनांना डायमंड मार्केट गेट क्रमांक 8 कडे वळवण्यात आले असून धीरूभाई अंबानी स्क्वेअरवरून यू-टर्न घेण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच कुर्ल्याहून पश्चिम द्रुतगती मार्ग किंवा भारत नगरकडे जाणाऱ्या वाहनांना डायमंड मार्केट सिग्नलपाशी डावे वळण घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
During the ongoing construction work of Metro Line 2B at BKC, a mechanical failure caused a 400 tonne mobile crane, which was lifting a pre-cast beam, to topple near the Asian Heart hospital junction. The mishap happened during the overnight work being carried out by the… pic.twitter.com/cHEcHWHmNh
— MMRDA (@MMRDAOfficial) April 15, 2026




























































