
मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग आणि स्वायत्त महाविद्यालयातील चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार 20 ते 28 जून दरम्यान ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाद्वारे ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी 29 जूनला पूर्ण केली जाणार असून 30 जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. 1 जुलै ते 2 जुलैदरम्यान ऑनलाइन शुल्क अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. द्वितीय गुणवत्ता यादी 3 जुलैला जाहीर केली जाणार असून 3 ते 4 जुलैदरम्यान ऑनलाइन शुल्क अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

























































