
मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्र उन्हाळी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बीएमएस सत्र-6 परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. 30 दिवसांच्या आत हा निकाल जाहीर करण्यात आला असून एकूण निकाल 83.47 टक्के लागला आहे. बीएमएसच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी एपूण 14040 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होते. यापैकी 13,854 एवढय़ा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 8738 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 1469 एवढय़ा विद्यार्थ्यांचे निकाल एबीसी आयडीअभावी राखीव ठेवण्यात आले आहेत. या परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. उन्हाळी सत्र 2026 च्या तृतीय वर्ष सत्र-6 च्या या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभागाचे उप पुलसचिव नरेंद्र खलाने यांनी नियोजन केले होते.
























































