मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षा 18 व 19 जुलै रोजी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने 14 जुलै रोजीच्या सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या. त्या परीक्षा 18 आणि 19 जुलै रोजी घेण्यात येणार आहेत. इंजिनीयरिंग, फार्मसी आणि एमएससी फायनान्स या विषयांच्या नऊ परीक्षांचा त्यात समावेश आहे. या परीक्षेची केंद्रे यापूर्वी जी होती तीच राहणार आहेत.

कम्युनिकेशन स्कील्स, प्रोफेशनल कम्युनिकेशन एथिक्स-1, फायनान्शियल अकाऊंटिंग ऍण्ड मॅनेजमेंट, इंटरप्रिन्युअरशिप मॅनेजमेंट, बिझनेस इफ्रास्ट्रक्चर ऍण्ड मॅनेजमेंट, ईआरपी, एथिक्स ऍण्ड सीएसआर, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज या विषयांच्या परीक्षा 18 जुलै रोजी होणार आहेत. क्लिनिकल इम्युनोलॉजी ऍण्ड इम्युनोपॅथॉलॉजी या विषयाची परीक्षा 19 जुलै रोजी होणार आहे.