‘मुंबई पुणे मुंबई-३’ मधील ‘आई तू बाबा मी होणार गं’ गाणं प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

दिवाळी हा वर्षाचा, अपार आनंदाचा पवित्र सण साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येत असते. या आनंदामध्ये यंदा भर पडली ती ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याच्या घराघरातील आगमनाने. हे अगदी वेगळ्या शैलीचे गाणे जेवढे कर्णमधूर आहे तेवढेच कुटुंबवत्सल आहे.

‘आई तू बाबा मी होणार गं…कुणी येणार गं’ हे गाणे हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायले आहे. या गाण्याला संपूर्ण नवा साज असून कानाला भावेल असे संगीत निलेश मोहरीर यांनी दिले आहे. देवयानी कर्वे-कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांनी हे गीत लिहिले आहेत.

मुंबई पुणे मुंबई ३ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि त्याला मराठी चित्रपट रसिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसादही लाभतो आहे. ३ हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.