शिवसेनेच्या आंदोलनानंतर टोलवसुली बंद

613

नगर मनमाड महामार्गाची दुरवस्था व होणारी टोलवसुली या विरोधात शिवसेनेने खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते, ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दररोज अनेक अपघाताचे सत्र सुरूच आहे. अपघातामुळे अनेकांचे जीव गेले आहेत तर काहींना कायमचेच अपंगत्व आले आहे. तरी सुद्धा सुप्रीमो ही कंपनी टोल वसुली करत आहे. रस्त्याची दुरावस्था, पडलेले खड्डे याची सर्वस्वी जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग व सुप्रीमो कंपनीची असून सुद्धा त्यांनी याकडे सक्षम दुर्लक्ष केल्याने शिर्डीतील शिवसेना शहरप्रमुख सचिन पराजी कोते यांनी मुबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकेच्या माध्यमातून या विरोधात आव्हान केले होते.

सदर याचिकेची सुनावणी शुक्रवारी झाली असून न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व अनिल किलोर यांनी टोल वसुली ही 12 डिसेंबर पासून बंद करावी असे राज्यशासनाला आदेश दिले असून, सदर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करून त्याची वसुली ही सुप्रीमो कंपनीकडून करावी व सदर अहवाल आठ आठवड्याच्या आत कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या