‘शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तात्काळ हटवा, अन्यथा…’, काँग्रेसचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांनी भाजप आणि राज्यपालांना घेरले आहे. यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यपालांवर टीका केली असून राज्यपालांना तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.

भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपाच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपाच्या प्रवक्तेन्या अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

‘3 वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर…’, अजित पवारांनी घेतला राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार

जळगाव जामोद येथे पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीचा खरपूर समाचार घेतला. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपाल कोश्यारींची जीभ कशी झडली नाही? त्यांच्या अशा विधानातून आरएसएसची मानसिकता दिसून येते. महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या दैवतांचा धडधडीत अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी? निवडणुकीत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसून वारंवार त्यांचाच अपमान करता, ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)