शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का? – नाना पटोले

महाराष्ट्रातील सोलापूरात असलेले मोठे प्रकल्प गुजरात व मध्य प्रदेश या भाजपाशासित राज्यांना आंदण दिले, तर राज्यातील पाणीही गुजरातला दिले. महत्वाची कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली आता कर्नाटक महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगू लागला आहे, हे राज्यातील सरकार कमजोर असल्यानेच होत आहे. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या शिंदे-फडणवीस यांना सरकार चालवता येत नसून त्यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे.

भाजपाचे नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक वादाचे खापर पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर फोडून आपल्या सुमार बुद्धीचे दर्शन घडवले आहे. सर्व गोष्टींना काँग्रेस व पंडित जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरून भाजपा आपले अपयश व नाकर्तेपणा झाकत आहे. सरकार म्हणून भाजपा कशाचीही जबाबदारी घेत नाही फक्त वादग्रस्त मुद्दे उकरून काढून जनतेची दिशाभूल करत आहे. जनतेचे मुलभूत प्रश्न हे सरकार सोडवू शकत नाही म्हणूनच असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. भाजपाचे हे प्रताप जनतेला आता चांगलेच समजतात पण त्यांचा हा कुटील हेतू साध्य होणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.