
कोरोना विषाणू संसर्गामुळे आज सात जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ३७८ एवढी झाली आहे. आज २३६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १४४३६ एवढी झाली आहे.
आज कौडगाव ता.लोहा येथील ७५ वर्षीय पुरुष, एकतानगर नांदेड येथील ७० वर्षीय पुरुष, मुक्रमाबाद ता.मुखेड येथील २४ वर्षीय पुरुष, धर्माबाद येथील ६१ वर्षीय पुरुष, बसवेश्वरनगर नांदेड येथील ५२ वर्षीय पुरुष, मानसनगर नांदेड येथील ७० वर्षीय महिला, धानोरा ता.किनवट येथील ६० वर्षीय महिला अशा सात जणांचा मृत्यू झाला आहे.
आज ११४१ रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तपासण्यात आले. त्यात ८७५ जणांचे रिपोट निगेटीव्ह आले आहेत तर आज २३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळले असून त्यामुळे एवूâण रुग्णसंख्या १४४३६ वर पोहंचली आहे.
आज नांदेड महापालिका क्षेत्रात १३२, वंâधार ४, अर्धापूर ६, भोकर ५, देगलूर ५, परभणी २, नांदेड ग्रामीण ८, मुखेड २२, नायगाव ८, लोहा ७, हिंगोली १, बीड १, धर्माबाद ११, किनवट ४, बिलोली २, हिमायतनगर ३, मुदखेड १०, उमरी २, माहूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आज २६७ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे वाटू लागल्याने सुट्टी देण्यात आली. त्यामुळे उपचार घेवून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १०४५० एवढी झाली आहे. आता वेगवेगळ्या कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात मिळून ३५३७ रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी ५३ जणांची प्रकृती गंभीर आहे.

























































