गुजरातच्या सीमेवर NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 80 किलो ड्रग्स जप्त

भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ एका पाकिस्तानी महिलेला सुमारे 80 किलो ड्रग्जसह अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात एटीएससोबत झालेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणी टीमने जवळपास 14 जणांना अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून गुप्त माहितीच्या आधारावर हे एजन्सींचे ऑपरेशन सुरू आहे.

एटीएस आणि एनसीबीने मिळून गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये एसओजी आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. भारतीय तटरक्षक दलाने ट्विटरवर याबाबत पोस्ट करून माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हंटलय की “गुजरात एटीएस आणि एनसीबीने समुद्रात रात्रभर केलेल्या कारवाईत, पश्चिम अरबी समुद्रात एक पाकिस्तानी बोट पकडली गेली. ज्यामध्ये 14 पाकिस्तानी क्रू मेंबर होते. त्यांच्याकडून 80 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. ” पकडले, ज्याची किंमत सुमारे 600 कोटी रुपये इतकी आहे.

फेब्रुवारीमध्येही पकडले होते 3,300 किलोचे ड्रग्ज

26 फेब्रुवारी रोजी अरबी समुद्रात एजन्सीद्वारे सगळ्याच मोठे ऑपरेशन केले गेले होते. ज्यामध्ये पोरबंदर किनारपट्टीजवळ 3,300 किलो चरससह पाच पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), भारतीय नौदल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत हिंद महासागरात किनाऱ्यापासून सुमारे 60 नॉटिकल मैल अंतरावर सुमारे 3,300 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले.