
दिल्लीतील शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याने बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेतने नसीरुद्दीन शाह यांना संताप अनावर झाला आहे. त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत केंद्र सरकारचा निषेध केला आहे. जर देश चालवणारे अडाणी असतील तर त्यांना हेच वाटेल की संपूर्ण देश अडाणीच राहावा, अशा शब्दांत त्यांनी लाठीहल्ल्याचा निषेध केला आहे. नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, आदाब, नमस्कार. मी नसीरुद्दीन शाह तुम्हा सर्वांना दोन गोष्टी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट अशी आहे की, जर एखादा अडाणी या देशाचे नेतृत्व करत असेल तर त्याला हेच वाटेल की, संपूर्ण देश त्याच्यासारखाच अडाणी, नासमझ, अयशस्वी आणि निर्दयी बनवा. कधीतरी आपल्या मुलांबद्दलही विचार करा आणि हेही लक्षात ठेवा की, तुम्हालाही एक दिवस तुमच्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल, असेही त्यांनी म्हटले.


























































