पाटण्यात विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीहल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीच्या विरोधात दिल्लीनंतर देशभरात निदर्शने सुरू झाली आहेत. बुधवारी पाटणा पोलिसांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. दिल्लीनंतर पाटण्यातही विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला झाल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पाटण्यात मोर्चा काढला. पोलिसांनी विद्यार्थ्यांना जेपी गोलंबरवर बॅरिकेडिंग करून थांबवले आणि परत जाण्यास सांगितले, परंतु आंदोलक विद्यार्थ्यांनी बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्यास सुरुवात करताच पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पाण्याचा फवारा (वॉटर कॅनन) केला. विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचे गोळे फेकण्यात आले आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांनी काठय़ा तुटेपर्यंत विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.