
कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन शिवसेनेचे तालुका संघटक चंद्रकांत गोडसे व कॅण्टोन्मेंट बोर्डच्या माजी नगरसेविका आशा गोडसे यांनी कॅण्टोन्मेंट हॉस्पिटलमधील डेडिकेटेड सेंटरसाठी 5 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले. चंद्रकांत गोडसे यांनी दानशूरांसह स्वखर्चातून 3 लाख किंमतीचे 5 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन मुंबई येथून आणून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या यंत्रांमुळे अनेक गंभीर कोरोना रुग्णांना मदत होणार आहे. याप्रसंगी डॉ. जयश्री नटेश, पंचायत समिती सदस्य डॉ. मंगेश सोनवणे, साहेबराव चौधरी, सुभाष बोराडे, गोपुळ मोजाड, माधव गोडसे, रवींद्र गायकवाड, विक्रम गोडसे, मधुकर गोडसे, गणेश देवकर उपस्थित होते.

























































