सिद्धूचा यु टर्न, राहुल गांधीमुळे नव्हे तर इमरान खान यांच्या आमंत्रणावर पाकिस्तानला गेलो होतो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
नवज्योत सिंग सिद्धू हे सध्या पंजाबचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आहेत. अनेक वर्ष भाजपमध्ये असलेल्या सिद्धू यांनी गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

राहुल गांधींनी आपल्याला पाकिस्तान पाठवले होते या वक्तव्यावरून सिद्धूने घुमजाव केले आहे. इमरान खान यांच्या आमंत्रणावर आपण पाकिस्तानात गेलो होतो, असे स्पष्टीकरण सिद्धूने दिले आहे. ट्विटरच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण दिले आहे. शुक्रवारी करतारपुर साहिब कॉरिडरच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमात सिद्धू पाकिस्तानला गेले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या सांगण्यावरून आपण पाकिस्तानात गेल्याचे सिद्धूने सांगितले. या व्यक्तव्यावरून सिद्धूने घुमजाव करत राहुल गांधींनी आपल्याला कधीच पाकिस्तानात जाण्यास सांगितले नसल्याचे म्हटले.

आपल्या वक्त्यव्याचा विपर्यास केला असून तोडून मोडून प्रसिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधींनी आपल्याला कधीच पाकिस्तानात जाण्यास सांगितले नव्हते, संपूर्ण जगाला माहित आहे की, पाकिस्तानच्या पंतप्रधान इमरान खान यांनी पाठवेल्या आमंत्रणावरून आपण तिथे गेलो असे सिद्धूने म्हटले आहे.

बेंगरूळूतल्या एका पत्रकार परिषदेत सिद्धू म्हणाले होते की, राहुल गांधींनीच पाकिस्तानात पाकिस्तानात पाठवले होते. माझे कप्तान राहुल गांधी आहे, त्यांनीच सगळीकडे पाठवल्याचे सिद्धूने म्हटले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांनी आपल्याला पाकिस्तानाला जाण्यास रोखले होते. परंतु २० काँग्रेसचे नेते आणि केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरून आपण पाकिस्तानात गेल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.