माँसाहेब, बाळासाहेब आज तुमची खूप आठवण येत आहे – सुप्रिया सुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेतेही मंत्रिपदाची शपथ घेतील. हा क्षण खूप आनंदाचा आहे यावेळी माँसाहेब मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हवे होते असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटर म्हटले आहे की, “माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात.तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल.”


आजचा दिवस हा विशेष आहे. आजच्या सुर्योदयाने महाराष्ट्र एक नवीन इतिहास घडवणार असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. तसेच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.