
केंद्र सरकारच्या नव्या कायद्याने ट्रकचालक प्रचंड आक्रमक झाले आहेत. सरकारने मोटार वाहन कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे वाहन चालक संतप्त झाले आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. तर नवी मुंबईत या कायद्याचा विरोध दर्शवण्यासाठी ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. तर उरण जेएनपीटी मार्गावर ट्रकचालकांनी पोलिसांना बांबूने मारहाण केली आहे.
केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलाने मोठा वादंग निर्माण झाला आहे. या कायद्याचा विरोध करण्यासाठी देशभरातील ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकारही समोर आला आहे. शिवाय आंदोलक ट्रक चालकांना गाड्यांवर दगडफेक तोडफोड केली आहे. केंद्र सरकारने दुरुस्त केलेल्या कायद्यानुासर अपघातास जबाबदार ट्रकचालकाला बारा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याला ट्रकचालकांनी विरोध केला आहे. ही दुरुस्ती मागे घेण्यासाठी आता ट्रक चालक रस्त्यावर उतरुन तीन दिवसांचा संप पुकारला आहे. ट्रकचालक एवढा दंड कसा भरणार, हा अत्याचार असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
उलवे नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. एनआरआय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे. ट्रक चालकांनी पनवेल सायन महामार्ग रोखला असून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस त्याचीही धडपकड करत आहेत.

























































