जे दारू पिणार, ते मरणार; नितीश कुमार यांचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील छपरा जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून बुधवारी विधानसभेत नितीश कुमार यांना धारेवर धरण्यात आले होते. गुरुवारी पत्रकारांनी नितीश कुमार यांना याबाबत विचारले असता त्यांनी ”जो दारू पिणार तो मरणारच” असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

”लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे. काळजी घेतली पाहिजे. कारण जो दारू पिणार तो मरणारच” असं वक्तव्य नितीश कुमार यांनी केले आहे. बुधवारी विधानसभेत या प्रकरणावरून भाजप आमदार आंदोलन करत होते. त्यावेळी नितीश कुमार यांनी त्यांना ”दारुडे आहात तुम्ही” असे म्हटले होते.

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने एप्रिल 2016 पासून पूर्ण दारूबंदी घोषित केली आहे. तेव्हापासून आतापर्यंत बिहारमध्ये अनेकवेळा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाले आहेत.