
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. होम क्वारंटाईनमध्ये 54, तर 14 दिवस अलिप्तता पूर्ण केलेले 51 जण निगराणीत आहेत. स्थिती पूर्णपणे आटोक्यात असली, तरी प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे.
शहरात कीटकनाशकांची फवारणी रोज केली जात आहे. प्रत्येक भागात दिवस-रात्र ही फवारणी सुरू आहे. महापालिकेच्या वतीनं निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांना मोकळीक देण्यात आली असल्यानं लोक घराबाहेर पडू लागलेत. पोलिसांनीही आता बाळाचा वापर कमी केलाय. पण तरीही अनावश्यक घराबाहेर पडू नका, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.




























































