पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही; प्रवाशांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (12-2-2023 रोजी) मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल- दुरुस्तीसाठी, वसई रोड आणि वैतरणा स्थानकादरम्यान शनिवार आणि रविवारी ( 11/12 फेब्रुवारी 2023 रोजी) अप जलद मार्गांवर रात्री 11.50 ते 02.50 वाजता आणि डाउन फास्ट मार्गांवर रात्री 01.30 ते 04.30 वाजेपर्यंत तीन तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. ब्लॉक कालावधीत ट्रेन क्र. 09101 विरार-भरूच मेमू 15 मिनिटे उशीराने धावेल. तर विरारहून 04:35 वाजेऐवजी 04:50 वाजता सुटेल.