फ्रेंच लेखिका ऍनी एर्नोक्स यांना साहित्याचे नोबेल 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्यातून सामाजिक बंधने उलगडून दाखविणाऱया फ्रेंच लेखिका ऍनी एर्नो यांना 2022 या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या साहित्यातील नोबेल पुरस्कारांची गुरुवारी घोषणा झाली. ऍनी यांनी अत्यंत गंभीर विषयांवर सोप्या भाषेत लिखाण केले असून त्यांच्या लिखणात धैर्यासोबत धाडसही आहे. आपल्या लेखनात त्यांनी प्रत्येक वर्गाचा समावेश केला आहे, असे नोबेलच्या वेबसाईटवर म्हटलेय.  82 वर्षीय ऍनी यांनी तब्बल 40 पुस्तके लिहिली आहेत. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा होते आणि डिसेंबरमध्ये पारितोषिक वितरण सोहळा पार पडतो.