
पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन दलित तरुणीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याने मोठा हिंसाचार झाला. ग्रामस्थांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेताना तो फरफटत नेला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवर संतप्त जमावाने दगडफेक केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी शीघ्र कृती दल बोलावण्याची वेळ आली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डत लाठीमार केला. दरम्यान, याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.



























































