Hero ची इलेक्ट्रीक स्कूटर फुकटात घरी घेऊन जाण्याची संधी, दिवाळीनिमित्त खास ऑफर

देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक टू व्हिलर कंपनी हिरो इलेक्ट्रीक (Hero Electric) ने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक खास ऑफर दिली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकाला 46 हजारांची इलेक्ट्रीक स्कूटर फुकटात घरी घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे. सणासुदीचा काळ पाहून कंपनीने लकी ड्रॉ ऑफरची घोषणा केली आहे.

हिरो इलेक्ट्रीक (Hero Electric) ची ही ऑफर जवळपास एक महिनाभर चालणार आहे. 7 ऑक्टोबरपासून या ऑफरला सुरुवात झाली असून 7 नोव्हेंबरपर्यंत या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. हिरो इलेक्ट्रीक (Hero Electric) कंपनीच्या कोणत्याही मॉडेलची इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी केल्यानंतर ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येईल.

हिरो इलेक्ट्रीक (Hero Electric) ची इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करणारा प्रत्येक ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहे. कंपनी महिनाभर दररोद एक लकी ड्रॉ काढणार आहे. या लकी ड्रॉ मध्ये ज्या व्यक्तीचे नाव येईल त्या व्यक्तीला कंपनीकडून एक्स-शोरुम रक्कम रिफंड अर्थात परत दिली जाईल. अशी पद्धतीने त्या नशिबवान ग्राहकाला हिरोची ही इलेक्ट्रीक स्कूटर मोफत मिळेल. कंपनी दररोज एक याप्रमाणे महिनाभरात 30 मोफत इलेक्ट्रीक स्कूटर देणार आहे.

शानदार फीचर्ससह येतेय Hero ची ‘ही’ ढासू स्पोर्ट बाईक…

दरम्यान, कंपनी फेस्टीव्ह ऑफरमध्ये फक्त मोफत इलेस्ट्रीक स्कूटर मिळवण्याची संधी देत नसून दुचाकी गाड्यांवर पाच वर्षांची अॅक्सिडंट वॉरंटीही देणार आहे. हिरोच्या इलेक्ट्रीक स्कूटरची बुकिंग 700 हून अधिक डिलरसह ऑनलाईन करू शकता. कंपनी ग्राहकांना मोफत फ्री डिलिव्हरीही देणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या