एनटीपीसीच्या वीज केंद्रांवर आता ड्रोनची नजर!

देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर कार्पेरेशनच्या (एनटीपीसी) औष्णिक वीज केंद्रांवर आता ड्रोनची नजर असणार आहे. एका औष्णिक वीज केंद्राला 50-60 एकर जागा लागते. तसेच त्याची उंचीही दीडशे-दोनशे फूट असते. त्यामुळे वीज केंद्राच्या परिसरात काय घडतेय, कुठे तांत्रिक बिघाड होऊ शकतो याचे ड्रोनच्या सहाय्याने निरीक्षण करता येणार आहे. ड्रोनच्या वापरासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने आणि नागरी उड्डाण महासंचलनाल्याने मंजुरी दिली आहे.

एनटीपीसीची एकूण वीज निर्मिती क्षमता 62 हजार मेगावॅट असून त्यामध्ये 24 औष्णिक वीज केंद्र असून त्याची स्थापित क्षमता 45 हजार 410 मेगावॅट एवढी आहे. औष्णिक प्रकल्पांचा विस्तार मोठा असल्याने त्याची दैनंदिन पाहणी करणे कर्मचाऱयानं जिकिरीचे होते. त्याची दखल घेत पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेशातील गदरवार सुपर थर्मल पॉवर प्लँट, विंद्याचल थर्मल पॉवर प्लांट आणि छत्तीसगडमधील सिपत सुपर थर्मल पॉवर प्लांटमध्ये ड्रोनचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हे ड्रोन प्रकल्पाच्या जागेवर देखरेख ठेवणे, कोळसा किती शिल्लक आहे या बरोबरच प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याचे एनटीपीसीने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या