
पितृपक्षात जेवण आणि साडी देण्याच्या बहाण्याने एका जेष्ठ महिलेची 9 हजारांची सोन्याची माळ चोरुन नेल्याची घटना सदाशिव पेठेतील खजिना विहीर परिसरात घडली. याप्रकरणी सुशीला दीनानाथ कदम (वय 70, रा. पर्वती ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खजिना विहीर चौकातील मारुती मंदिरासमोर सुशीला हार-फुले विकत होत्या. त्यावेळी तेथे आलेल्या एका महिलेने आजी माझ्या घरी पितृपक्षाचे जेवण आहे. तुम्ही माझ्या घरी चला, मी तुम्हाला शिधा आणि साडी देते अशी बतावणी केली. त्यामुळे सुशीला महिलेसोबत जात होती. त्यावेळी महिलेने सुशीला यांना आजी अंधार खूप झाला आहे, तुमच्या गळ्यातील सोन्याची माळ माझ्याकडे द्या, मी तुम्हाला घरी गेल्यानंतर परत देते, असे सांगितले. त्यामुळे सुशीलाने त्यांच्या गळ्यातील 9 हजारांची सोन्याची माळ महिलेकडे दिली. काही अंतरावर गेल्यानंतर महिला पसार झाली. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. जाधव यांनी दिली.
































































