जिन्ना यांना पंतप्रधान केले असते तर फाळणी झालीच नसती; राजभर यांचे वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मोहम्मद अली जिन्ना यांना देशाचे पहिले पंतप्रधान बनवले असते, तर देशाची फाळणीच झाली नसती, असे विधान त्यांनी केले आहेत. याआधीही वादग्रस्त विधाने केल्याने राजभर चर्चेत आले होते.

अखिलेश यादव यांनी एका सभेत जिन्ना यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावरून वादाला तोंड फुटले. त्याबाबत राजभर यांना विचारण्यात आले असता त्यांनी वक्तव्य केले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी नेहमी जिन्ना यांचे गुणगान करत होते. मात्र, जिन्ना यांचे विचार समजून घेण्याचाही गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पत्रकारांनी राजभर यांना जिन्ना यांच्याबाबत प्रश्न विचारला अशा, ते पत्रकारांवरच संतापले. तुम्ही जिन्ना यांच्याशिवाय वाढत्या महागाईवर प्रश्न का विचारत नाही. हे सर्व भाजपमुळे होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंदू- मुसलमान, हिंदुस्थान -पाकिस्तान मुद्दे हटवले तर भाजपची बोलती बंद होते, असेही राजभर म्हणाले.

राजभर यांच्या पक्षाने अखिलेश यादव यांच्या सपासोबत आगामी निवडणुकांसाठी युती केली आहे. त्यामुळे अखिलेश यांनी जिन्नांबाबत केलेल्या विधानावर राजभर यांना विचारण्यात आले असता त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दोन्ही पक्षात युती झाली असून जागावाटपाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही.