पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात, एक ठार, आठजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱया तालुक्यातील धनगरवाडी येथील वारकऱयांच्या गाडीला रविवारी रात्री उशिरा अपघात झाला. यात एका वारकऱयाचा मृत्यू झाला असून, आठजण जखमी झाले आहेत. बीड जिह्यातील आष्टी तालुक्यातील हाकेवाडी शिवारात ही घटना घडली.

रावण सखाराम गाढे (वय 55) असे मृताचे नाव आहे. बंडू बाजीराव गाढे, हरि बबन चितळे, अशोक रावसाहेब चितळे, शोभा महादेव चितळे, गोरक्ष दादाबा गाढे, कोंडाबाई पंढरीनाथ गाडे, तुळशीराम नामदेव गाढे, सुधाकर भाऊ गाढे (सर्व रा. धनगरवाडी, ता. पाथर्डी) हे जखमी झाले आहेत.

धनगरवाडी येथील वारकरी पिकअप गाडीने पंढरपूरला गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना हाकेवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या खडीच्या ढिगाऱयावर जाऊन त्यांची गाडी उलटली. यात गाढे यांचा जागीच मृत्यू झाला, तर आठजण जखमी झाले. जखमींपैकी तिघांना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आष्टी पोलिसांत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.