
सामना ऑनलाईन । मुंबई
इयत्ता अकरावीच्या २०१८-१९च्या प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या ४८ तासांहून अधिक काळ पडत असलेल्या पावसामुळे ही मुदत वाढवण्यात आलीआहे. मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करत ही माहिती दिली आहे.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीच्या प्रवेशाची मुदत बुधवार ११ जुलै २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनाही पहिल्या फेरीतील प्रवेश अद्ययावत किंवा रद्द करण्यासाठी आणि जागा समर्पित करण्यासाठीही ११ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजताची मुदत देण्यात आली आहे.
























































