अखेर अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया संपणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मे महिन्यापून सुरू झालेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेने प्रवेशफेऱयांचा विक्रम गाठला असून उद्या 25 ऑक्टोबरला शेवटची दैनंदिन गुणवत्ता फेरी राबविली जाणार आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी असून सकाळी 10 नंतर प्रवेशाला सुरूवात होणार आहे. यानंतर यंदाची अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया संपणार आहे.

तीन नियमित प्रवेशफेऱया, सात विशेष फेऱयांनंतर 19 ऑक्टोबरपासून दैनंदिन गुणवत्ता फेरीला सुरूवात झाली. या फेरीत विद्यार्थ्यांच्या दैनिक गुणवत्तेवर आधारित प्रवेश देण्यात आले. मुंबई विभागातून आतापर्यंत पार पडलेल्या तीन दैनंदिन गुणवत्ता याद्यांमधून 172 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्रवेशेत्सुक विद्यार्थ्यांना प्रवेशशाची शेवटची संधी सणार आहे.

90 हजार 309 जागा रिक्त

अकरावी ऑनलाईन प्रवेशानंतर अकरावीच्या मोठया प्रमाणावर जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबई विभागात अकरावीच्या 90 हजार 309 जागा रिक्त राहिल्या आहेत. यातील सर्वाधिक जागा या विनाअनुदानित कॉलेजमधील आहेत.