पहिल्या दोन टप्प्यांत फक्त 8 टक्के महिला उमेदवार

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत एकूण 2,823 उमेदवारांपैकी केवळ 8 टक्के महिला होत्या.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 135 आणि दुसऱया टप्प्यात 100 महिला उमेदवार होत्या, ज्यामुळे पहिल्या दोन टप्प्यांसाठी एकूण 235 महिला उमेदवार रिंगणात होत्या.

19 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 1625 उमेदवार रिंगणात होते. 26 एप्रिलच्या दुसऱया टप्प्यात 1198 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

तामीळनाडू, केरळमध्ये सर्वाधिक महिला

पहिल्या टप्प्यातील 135 महिला उमेदवारांपैकी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 76 महिला उमेदवार होत्या. तथापि ही संख्या राज्यातील एकूण उमेदवारांपैकी फक्त 8 टक्के आहे. दुसऱया टप्प्यात केरळमध्ये सर्वाधिक 24 महिला उमेदवार होत्या. पक्षनिहाय, काँग्रेसने दोन टप्प्यांत 44 तर भाजपने 69 महिलांना उमेदवारी दिली.