VIDEO-पगाराचे अडीच लाख न दिल्याने जाळून घेणाऱ्या नोकराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नांदेड

मालकाने पगाराचे अडीच लाख रूपये थकवल्याने कंटाळलेल्या नोकराने स्वत:ला जाळून घेतले होते.  या दुर्घटनेत जबर भाजलेल्या हिदायत युनूस शादूलकर याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्याने ३१ डिसेंबरच्या रात्री स्वत:ला जाळून घेतलं होतं. हिदायतच्या मृत्यूनंतर त्याच्या मालकासह तीन जणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड शहरातील फ्रेंड्स जर्दा स्टोअरसमोर हिदायतने स्वत:ला पेटवून घेतलं होतं. हिदायत युनूस हा  फ्रेंड्स जर्दा स्टोअर्सचे मालक सलीम सौदागर यांच्या ड्रॅगन एनर्जी ड्रिंकसाठी मार्केटिंगचे काम करत होता. गेली एक वर्ष सलीम सौदागरने हिदायतचा पगार थकवला होता. पगाराची रक्कम अडीच लाख रूपये झाली होती. हा पगार मिळावा यासाठी हिदायतने सलीमकडे अनेकदा विनंती केली होती. यामुळे संतापलेल्या सलीमने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.  या त्रासाला कंटाळून हिदायतने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. हिदायतच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने सलीम सौदागर, रेहान सौदागर यांच्यासह एका महिलेविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या आधारावर या तिघांविरूद्ध वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.