
देशात कोरोना संकट वाढत असताना ऑक्सिजनची टंचाई वाढत आहे. तसेच गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या किंमतीत वाढ झाली आहे. अनेक राज्यांनी इतर राज्यात ऑक्सिजन पाठवण्यास मनाई केली आहे.
कोरोना काळात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. अशा वेळी अनेक राज्यात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये ऑक्सिजन अभावी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण राज्य सरकारने हे वृत्त फेटाळले आहे. अनेक राज्यांनी इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवठ करण्यास मनाई केली आहे. तेव्हा केंद्र सरकारने राज्य सरकारांना पत्र लिहून असे न करण्याची विनंती केली आहे.
गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या किंमतीही वाढल्या आहेत. तेलंगाणात प्रति घन मीटर ऑक्सिजनच्या किंमतीत 10 ते 50 रुपयांनी वाढली आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये जरी ऑक्सिजनची टंचाई नसली तरी खासगी रुग्णालयात ऑक्सिज जास्त दराने विकले जात आहे. ओडिशामध्ये एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत साडे सहा हजारहून 10 हजार रुपयांवर पोहोचली आहे. तर सिलेंडर भरण्याचे दर दुप्पट झाले आहे. जुलै मध्ये त्यासाठी 350 लागत होते आता हे दर वाढून 900 रुपयांवर वाढले आहे.
























































